सूचनाफलक सूचनाफलक तयार करणे. एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे. दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना दयाव्या लागतात. दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो. अपेक्षित कृती योग्य तऱ्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे. यापूर्वी तुम्ही सूचनाफलक या घटकाचा अभ्यास केलेला आहे. या इयत्तेत तुम्ही स्वतः सूचनाफलक तयार करायला शिकणार आहात. सूचनाफलकाचे विषय (१)
शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना. (२) सहलीसंदर्भात सूचना. (३) रहदारीसंबंधी सूचना. (४) दैनंदिन व्यवहारातील सूचना. सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी (१) सूचना कमीत कमी शब्दांत असावी. (२) सूचेनेचे लेखन स्पष्ट शब्दांत, नेमके व विषयानुसार असावे. (३) सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावेत. (v) लेखना